भरत मोहनी - लेख सूची

विक्रम आणि वेताळ – भाग १०

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. “राजन्, ह्या खेपेला बराच उशीर केलास, काय कारण झालं? सोपवलेल्या कामाचा विसर तर पडला नाही ना तुला?” “छे, छे, चांगलंच लक्षात आहे माझ्या सगळं. परंतु त्यासाठी तू काही कालमर्यादा घालून दिल्याचं मात्र स्मरणात …

विक्रम आणि वेताळ – भाग ९

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. “राजन्, आता एकदा आपण सिंहावलोकन करूया.” “तुला रे कशाला हवं सिंहावलोकन? तसाही फांदीवर उलटा लटकत करतोसच की मागच्या वाटेचं अवलोकन. वेताळावलोकन म्हण हवं तर त्याला.” “बरं,बाबा, तसं म्हण. खूश?तर, सर्वप्रथम फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची …

विक्रम आणि वेताळ – भाग ८

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. “राजन्, गेल्या खेपेत तू सर्वसमावेशक सुखाची व्याख्या ‘प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात, जे हवेहवेसे, आनंददायक वाटते आणि जे त्याच्यासाठी कल्याणकारक, समाधानकारक असते ते सुख आणि अर्थातच ह्याच्याच विरुद्धार्थी दुःख’ अशी केलीस. तसेच व्यक्तिगत सुखाची व्याख्या; ‘प्रत्येक व्यक्तीने जो अग्रक्रम ‘स्वतः’ निवडून एखाद्या गोष्टीस प्राधान्य …

विक्रम आणि वेताळ – भाग ७

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. “हां, तर कुठे होतो आपण राजन्?”  “तू त्या झाडाच्या फांदीवर उलटा लोम्बकळत होतास; मी तिकडून, काट्याकुटयांनी भरलेल्या पायवाटेने येऊन तुला फांदीवरून कसंबसं उतरवून खांद्यावर घेतलं आणि आता  स्मशानाच्या दिशेने निघालो आहे.”  “तसं नाही रे बाबा, …

विक्रम आणि वेताळ – भाग ६

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. “राजन्, गेल्या खेपेत तू आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधताना आपल्या स्वभावामुळे येणाऱ्या अडचणींविषयी बोललास. त्यातील पहिली: वैचारिक आणि शारीरिक शक्ती खर्च करण्याची आपली अनिच्छा; आणि त्यातून …

विक्रम आणि वेताळ – भाग ५

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला. “राजन्, गेल्या खेपेत, आपल्याला आपल्या कल्पनासाम्राज्यात वास्तवाची किंवा तर्कबुद्धीची बोच कशी नकोशी वाटते आणि सभोवतालचं वास्तव जितकं जास्त कटू/दुस्सह असेल तितकं आपल्याला आपल्या काल्पनिकविश्वाचं आकर्षण कसं जास्त असतं, हे जे तू सांगितलंस ते …

विक्रम आणि वेताळ – भाग ४

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला. “राजन्, भारतीय तत्त्वज्ञानाच्या षट्दर्शनांतील प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या दोन प्रमुख ज्ञानस्रोतांच्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नसून निव्वळ भ्रम कसा आहे हे तू सिद्ध केलंस. त्यामुळे आता ते मान्य करणं तर भागच आहे. पण असं …

विक्रम आणि वेताळ – भाग ३

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. “राजन्, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातील षट्दर्शनांच्या प्रत्यक्षप्रमाण ह्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नाही, हे तू गेल्या खेपेत सिद्ध केलंस. परंतु फलज्योतिष हे भविष्याचा वेध घेतं, त्यामुळे आपण ते ‘अनुमान’ ह्या ज्ञानाच्या दुसऱ्या स्रोताच्या …

विक्रम आणि वेताळ – भाग २

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. “राजन्, अरे गेल्या खेपेला तू माझ्यावर एकदम तलवारच उगारलीस, त्यामुळे मी माझं पूर्ण समाधान झालं असं म्हणून तर टाकलं, पण खरं सांगू? माझं अर्धवटच समाधान झालं होतं. त्याविषयीचे आणखीनही बरेच प्रश्न मला छळताहेत. …

विक्रम आणि वेताळ – भाग १

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला, आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.  “हे राजन्, नेहमी मी तुला गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीच्या आधाराने तुला प्रश्न विचारतो, पण नेहमी मीच का सांगायची गोष्ट तुला? आणि खरंतर इतकी वर्षं तुला गोष्टी सांगून सांगून आता माझा गोष्टींचा स्टॉकही संपला आहे. तेव्हा असं …

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला. राजा, खरेतर नियमाप्रमाणे मला तुला गोष्ट सांगणे आणि त्यानंतर प्रश्न विचारणे भाग आहे, पण खरे सांगू? आज कोणतीही नवीन गोष्ट तुला सांगण्याची अजिबात इच्छा नाही बघ. त्यापेक्षा असे करू या का? आपला जो हा उद्योग …

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत काढण्यासाठी तो पुढे सरसावला. परंतु हे काय, समोरील दृश्य पाहून राजा विक्रमादित्याच्या मनाचा थरकाप झाला. आज त्याला जवळपास सगळ्याच झाडांवर प्रेते लटकलेली दिसत होती. झाडांवर इतकी प्रेते कशी काय आली असा विचार करीत असतानाच त्याची दृष्टी त्याला हव्या असलेल्या प्रेतावर पडली. झाडावरील ते प्रेत खांद्यावर टाकून विक्रमादित्याने आपली …

विक्रम, वेताळ आणि आधुनिक शेख महंमद

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि आपली पावले त्याने स्मशानाच्या दिशेने वळवली. थोडे अंतर जाताच प्रेतातील वेताळ त्याला गोष्ट सांगू लागला. . . . राजा, कोणे एके काळी केकय देशात सत्यवान नावाचा एक ब्राह्मण राहत होता. केकय देशाची परिस्थिती तशी वाईटच होती. अर्ध्याहून अधिक प्रजा अत्यंत दरिद्री होती. देशाची लोकसंख्या …

विक्रम-वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला. राजा, ह्या वेळेस मी तुला थोडी अलीकडची गोष्ट सांगणार आहे. अमरावती नावाचे एक राज्य होते. हे राज्य अत्यंत प्रगत राज्य होते. त्या काळच्या राज्यांमध्ये सगळ्यांत प्रगत आणि संपन्न. तेथील प्रजा शिकली-सवरलेली आणि उद्यमशील …

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला, तेव्हा प्रेतातील वेताळ बोलू लागला: आटपाट नगर होते, तेथे एक राजा राज्य करत होता. राजा प्रगतिशील होता आणि प्रजेला सुशिक्षित, संपन्न करण्यासाठी झटत होता. परंतु इतक्यात त्याची झोप एका विचित्र प्र नामुळे उडाली होती. त्याची प्रजा जरी सुशिक्षित व …